साखर कारखान्यासमोर माजी मुख्यमंत्र्यांचे मौन व्रत आंदोलन

लक्सर : ऊस दर जाहीर न झाल्याने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनात सरकारला आलेले अपयश आणि ऊस खरेदी दर जाहीर न केल्याबद्दल साखर कारखान्यासमोर एक तास मौनव्रत आंदोलन केले. आधी पेट्रोल आणि डिझेलची असह्य दरवाढ करून जनतेला लुटले गेले. आणि आता लुटलेले धन जनतेमध्ये वाटले जात आहे अशी टीका त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये भाजपचा सुफडासाफ होईल असे ते म्हणाले.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत शेकडो कार्यकर्त्यांसह लक्सरला पोहोचले. येथे ऊस दर जाहीर न केल्याबद्दल त्यांनी साखर कारखान्यासमोर एक तास मौन व्रत आंदोलन केले. त्यानंतर हरीश रावत म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत आहे. आधी दरवाढ करून लोकांना लुटण्यात आले आणि आता इंधनाचे दर कमी करून लोकांसोबत राजकारण केले जात आहे. महाराष्ट्र, केरळ वगळता उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. जर आमचे सरकार आले, तर नक्कीच देवस्थान बोर्ड विसर्जित केले जाईल. शेतकऱ्यांना सावरायला बळ येईल एवढा ऊस दर दिला जाईल. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. यावेळी रिना गुप्ता, कमला कश्यप, बबली देवी, आरिफ राणा, डॉ. उमा दत्त शर्मा, माजी आमदार हाजी तस्लीम, धर्मराज चौहान, ताहिर हसन, माजी अध्यक्ष जगदेव सिंह जग्गी, संजय वर्मा, रोशन लाल, नत्थू सिंह, सत्यवीर सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here