बंगळुरू : भारताची सिलिकॉन व्हॅली असलेल्या बंगळुरूमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने मुख्य रस्ते जलमग्न झाले. अपार्टमेंट्सचा परिसर आणि घरांमध्येही पाणी घुसल्याने तसेच खंडीत विज आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने आपत्कालीन यंत्रणेला बोटी, ट्रॅक्टरचा आधार वाहतुकीसाठी घ्यावा लागला. रेनबो ड्राइव्ह लेआउट, सनी ब्रूक्स लेआउट आणि सरजापूर रोड परिसराताल पाणी साठल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
टाइम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, टॉनी आयटी हबसह बाहेरील रिंग रोडवर पाणी साठले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. अनेकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठावे लागले. जनजीवन विस्कळित झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. अनेक लोकांनी जलमग्न घरांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकत सरकारवर टीका केली आहे.