सिंभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम लवकरच होणार सुरु

128

गढमुक्तेश्‍वर : नवा गाळप हंगाम सुरु करण्याबाबत सिंभावली साखर कारखान्यामध्ये तयारी सुरु झाली आहे. ज्याअंतर्गत मशीन्सची दुरुस्ती आणि इतर कामे केली जात आहेत.

पश्‍चिमी उत्तर प्रदेशाला देशातील प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते, इथे शेतकर्‍यांची उपजिविका ऊसाच्या शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऊसाचे पीक चांगले होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे कितीतरी महिने लागू झालेल्या लॉकडाउन मुळे पीकांचे मोठे नुकसान झाले होते, तर गेल्या वर्षीची ऊस थकबाकी अजूनही भागवली गेलेली नाही. ज्यामुळे अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला ऊस अत्यंत कमी दराने गुर्‍हाळामध्ये विकावा लागला. यंदा साखर कारखान्याचा गाळप हंगाम 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल, जे गरजू शेतकरी आपला ऊस कमी दराने विकत होते. आगामी गाळप हंगाम योग्य वेळेत सुरु होवू शकेल यासाठी कारखाना व्यवस्थापनाने मशिन दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

सिंभावली साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक करण सिंह यांनी सांगितले की, शासनस्तरावर आता कारखाना सुरु करण्याच्या संदर्भात कोणतीही तारीख निश्‍चित झालेली नाही. पण 25 ऑक्टोबर च्या आसपास कारखान्याचा गाळप हंगाम सरु होण्याची शक्यता असल्याने मशीन दुरुस्तीसह इतरही आवश्यक तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यांनी दावा केला की, जर आगामी गाळप हंगाम वेळेत सुरु झाला तर शेतकर्‍यांना त्यांचे पैसे भागवणे खूप सोपे होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here