तांदूळ बंदीतून मुक्त केल्याबद्दल सिंगापूरने मानले भारताचे आभार

तांदळावरील बंदीतून सूट दिल्याबद्दल सिंगापूरने भारताला धन्यवाद दिले आहेत. दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ केल्याबद्दल कौतुक केले आहे. भारतातील सिंगापूरच्या राजदूताने याबाबत ट्वीट केले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तांदळावरील बंदीतून सवलत दिल्याबद्दल सिंगापूर भारत सरकारचे आभार मानते असे त्यांनी एक्स (ट्वीटर) वर ट्वीट केले आहे. भारत आणि सिंगापूर हे दोन्ही देश मजबूत धोरणात्मक भागीदार आहेत. आमची ही घट्ट मैत्री वाखाणण्याजोगी आहे. तर याबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, भारत आणि सिंगापूरमध्ये मजबूत संबंध आहेत. म्हणूनच भारताने सिंगापूरला अन्नाची गरज भागवण्यासाठी तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने २७ ऑगस्ट रोजी, बासमती तांदळाच्या निर्यातीवर अतिरिक्त दक्षता घेत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सध्या प्रतिबंधित श्रेणीत असलेल्या बिगर बासमती पांढर्‍या तांदळाची निर्यात रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. बिगर बासमती तांदळाच्या अवैध निर्यातीबाबत अनेक अहवाल प्राप्त झाले आहेत, असे सरकारने म्हटले आहे.
सरकारला बासमती तांदळाच्या नावावर उकडा तांदूळ आणि गैर बासमती सफेद तांदळाची निर्यात सुरू असल्याचे दिसून आले होते. त्याआधीच सरकारने २० जुलैपासून गैर बासमती तांदळाची निर्यात बंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here