प्रलंबित मागण्यांसाठी मजूरांची कारखाना गेंटवर निदर्शने

सीतामढी : साखर कारखान्याच्या मजूर संघाकडून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनामध्ये वर्कर्स युनियन चे अध्यक्ष रामानंदन ठाकुर, सचिव मनोज कुमार, साखर कारखाना मजूर सभेचे अध्यक्ष महासचिव सह भरत शाह, नंदलाल ठाकूर, अवधेंश कुमार सिंह आदींचा समावेश होता. साखर कारखान्यांच्या मुख्य गेटवर डझनभर  मजूरांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली. दरम्यान, साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी मजूरांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला. मजूरांनी सांगितले की, आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होतो. पण कारखाना व्यवस्थापनाकडून आमच्यावर बळाचा वापर करण्यात आला, मुख्य गेटजवळच्या रस्त्यालगत मजूरांनी निदर्शने सुरु ठेवली. कारखान्यात काम करणार्‍या जवळपास 400 कामगारांना साखर कारखाना व्यवस्थापनाने 2 महिन्यांसाठी पे ऑफ करुन कामावरुन काढून टाकले.11 मे ला साखर कारखाना व्यवस्थापनाकडून नोटीस देवून कारखान्याचे मेन गेट लावून घेण्यात आले. तर विज, पाणी तसेच अनेक आपातकालीन सेवा चालू ठेवल्या आहेत. जिथे काही लोक काम करत आहेत. कारखाना डीजीएम इलेक्ट्रीशियन अनुपकुमार पात्रा यांच्याशिवाय काही इतर कार्यरत कर्मचार्‍यांना किसान भवन जवळ अज्ञात मजूरांकडून मारपीट करण्याबाबत व्यवस्थापन बोलत आहेत. याबाबत व्यवस्थापनाकडून स्थानिक ठाण्यामध्ये तक्रार देंवून इलेक्ट्रीशियन कडून मारपीट करणे तसेच कार्यात बाधा आणण्याचा आरोप करुन कारवाईची मागणी केली आहे. यानंतर सुरक्षेचा विचार करुन रीगा पोलिस ठाण्याकडून कारखान्यांच्या मुख्य गेटवर पोलिसांना तैनात केले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here