सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता

90

सितारगंज : चार वर्षांपूर्वी, २०१७ पासून बंद राहिलेल्या किसान सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी आणि परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमदार सौरभ बहुगुणा यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी कॅबिनेटच्या बैठकीत आगामी गळीत हंगामापूर्वी कारखाना सुरू करण्याचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नोव्हेंबर २०१७ मध्ये सरकारने हा साखर कारखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आमदार बहुगुणा यांच्या प्रयत्नांनी हा कारखाना पुन्हा सुरू होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. १९८१च्या दशकात या साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. आसपासच्या परिसरासह लांब अंतरावरूनही शेतकरी येथे ऊस गाळपासाठी आणतात. २०१७ मध्ये गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वीच राज्य सरकारने कारखाना बंद केला. त्यामुळे या क्षेत्रातील उसाचे उत्पादन आठ हजार हेक्टरवरून घटून आता ५००० हेक्टरवर आले आहे.

सितारगंजसह मेला घाट, नानकमत्ता, अमरिया, बरा, बरी, चोरगलीया, खटीमा आदी ठिकाणहून कारखान्याकडे ऊस गळीतासाठी येतो. कारखान्याची क्षमता प्रतिदिन २५ हजार क्विंटल ऊस गाळपाची आहे. कारखाना बंद झाल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. आता मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अधिकाऱ्यांना गळीत हंगाम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी यासाठीच्या आवश्यक त्या तयारीत गुंतले आहेत.
बैठकीला ग्राम विकास स्थलांतरण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. एस. एस, नेगी, मुख्यमंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार डॉ. नरेंद्र सिंह, अप्पर मुख्य सचिव मनीषा पवार, सचिव अमित नेगी, राधिका झा, शुगर फेडरेशनचे चंद्रेश यादव, अप्पर सचिव डॉ. बी. शण्मुगन आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखाना बंद पडल्यानंतर ४२ कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत वेतनाबाबत उच्च न्ययाालयात याचिका दाखल केली आहे. ती सध्या प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here