सितारगंज साखर कारखाना पुन्हा बंद पडू देणार नाही : मंत्री बहुगुणा यांची घोषणा

सितारगंज : कॅबिनेट मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच उधम सिंह नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या ऊस, पशूधन मंत्री सौरभ बहुगुणा यांचे जिल्ह्यात पक्ष कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेने ठिकठिकाणी भव्य स्वागत केले. आपल्या विधानसभा मतदारसंघात सितारगंज येथे पोहोचलेल्या मंत्री बहुगुणा यांनी साखर कारखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून साखर कारखाना आणखी चांगल्या पद्धतीने कसा चालवता येईल याबाबत चर्चा केली. अडचणींची माहिती घेतली.

एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशितवृत्तानुसार, प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री बहुगुणा यांनी सांगितले की कॅबिनेट मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच येथे येत आहे. कारखान्याची पाहणी करून अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. साखर कारखाना पूर्वीप्रमाणे वारंवार बंद पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्याकडे आणावा. यासोबतच ऊस उत्पादकांचे थकीत बिल देण्याबाबत सरकारशी चर्चा केली जाईल असे मंत्री म्हणाले. मंत्री बहुगुणा यांनी किच्छा आणि जसपूर साखर कारखान्याचीही पाहणी केली. शेतकऱ्यांना लवकरच थकीत ऊस बिले दिली जातील असे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here