आसाममध्ये पूरस्थिती बिकट : ७ जिल्ह्यांतील ५७,००० लोकांना फटका

गुवाहाटी : आसाममध्ये मान्सूनआधीच आलेल्या पुरामुळे लोकांची स्थिती अतिशय बिकट बनली आहे. सात जिल्ह्यांतील ५७,००० लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २५ महसूल मंडलांतील २२२ गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. जवळपास १०,३२१.४४ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे एका बालकासह तिघांना जीव गमवावा लागला. या आपत्तीमध्ये आतापर्यंत २०२ घरे कोसळली आहेत. राज्यात १८ मार्चपर्यंत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

याबाबत टाइम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पूरग्रस्त भागात लष्कर, एसडीआरएफ, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके बचाव कार्यात मदत करीत आहेत. होजई, लखीमपूर, नागाव जिल्ह्यात रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. भूस्खलनाने अनेक ठिकाणी पाणी घुसले आहे. रेल्वे मार्गांचे मोठे नुकसान झाले असून डोंगराळ भागातील वाहतूक, दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. लुमडिंग डिव्हाजनमध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसल्याने उत्तरपूर्व फ्रंटियर रेल्वेने मार्ग बदलले आहेत. पावसात दोन रेल्वे अडकल्या होत्या. १४०० लोकांना सुरक्षितपणे हवाई दल, एनडीआरएफ, आसाम रायफल्ससह स्थानिक लोकांनी सुरक्षित स्थळी आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here