खानदेशात सहा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरु

नंदूरबार : खानदेशात सहा साखर कारखाने वेगात सुरू असून सुमारे १३ लाख टनापेक्षा ऊस गाळप झाले आहे.खानदेशात उसाची सर्वात जास्त १३ हजार हेक्टर लागवड नंदूरबार जिल्ह्यात झाली होती. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टर धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र आहे. नंदुरबारात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाला पसंती दिली आहे. जळगावात चाळीसगाव पाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, चोपडा या भागांतही ऊस पीक आहे. साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. इतर भागात खानदेशातील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारातील कारखान्यांनी केले आहे. समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात खानदेशात आघाडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here