२०२२-२३मध्ये ब्राझीलच्या साखर उत्पादनात किरकोळ वाढ शक्य : कोवरिग अॅनालिटिक्स

275

न्यूयॉर्क : ब्राझीलच्या दक्षिण -मध्य क्षेत्रामध्ये एप्रिल २०२२- मार्च २०२३ या हंगामात साखर उत्पादन ३४.१७ मिलियन टन होईल असे अनुमान साखर उद्योग क्षेत्रातील विश्लेषक कोवरिग अॅनालिटिक्सने केले आहे. सध्याच्या हंगामातील ३३.०६ मिलियन या अंदाजापेक्षा थोडे अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शुगर ऑनलाईन कंपनीद्वारे आयोजित साखर परिषदेत एका सादरीकरणावेळी कोवरीग अॅनालिटिक्सने सांगितले की, जर कोरडे हवामान जर सामान्य स्तरावर आले तर यंदाच्या ५३२ मिलियन टनाच्या तुलनेत ब्राझीलमध्ये पुढील हंगामात ५५२ मिलियन टन ऊस उत्पादन होऊ शकते.

सध्याच्या हंगामात ब्राझीलमध्ये उसाचे उत्पादन १२ टक्क्यांहून अधिक घटून गेल्या दशकभरात सर्वात कमी होण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. प्रचंड दुष्काळ आणि त्यापाठोपाठ थंडीने उत्पादनात घसरण झाली आहे. साखर विश्लेषक क्लॉडियू कोवरिगने आपल्या सादरीकरणात सांगितले की, अत्यंक कडक दुष्काळानंतर नव्या हंगामात पिकाची नवी लागवड नेहमीपेक्षा कमी राहील. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे. पुढील हंगामात ऊसावर आधारित इथेनॉल उत्पादन थोडे वाढून २४.३२ बिलियन लिटर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २०२२-२३ मध्ये ब्राझीलमधील साखर निर्यात २०२१-२२मध्ये झालेल्या २३.९ मिलियन टनावरुन वाढून २५ मिलियन टन (कच्ची आणि पांढरी साखर) होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here