देशामध्ये मंदावली कोरोनाची गती

भारतामध्ये कोरोना संक्रमणाचा फैलाव आता मंद झाला आहे. देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग 50 हजारापेक्षा कमी कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ही गोष्ट दिलासादायक आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासात जवळपास 44 हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत, ज्यांची संख्या मंगळवारच्या तुलनेत जवळपास पाच सहा हजाराने अधिक आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये गेल्या 24 तासात 43,893 नवे कोरोनाग्रस्त समोर आले आहेत, ज्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या वाढून 79,90,322 झाली आहे. तर दरम्यान, 508 लोकांचा मृत्यु झाला आहे, ज्यामुळे मरणार्‍यांची संख्या 1,20,010 वर पोचली आहे.

चांगली गोष्ट ही आहे की, अ‍ॅक्टिव्ह केसच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह संख्येत 15,054 इतकी घट झाली आहे, ज्यामुळे आताही देशामध्ये एकूण 6,10,830 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. याप्रकारे गेल्या 24 तसात 58,439 लोक बरे झाले आहेत. आता देशामध्ये एकूण 72,59,509 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

जर देशामध्ये कोरोना तपासणी बाबत बोलायचे झाल्यास भारतात कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी करुन संक्रमितांना गाठण्याच्या मोहिमेमध्ये 27 ऑक्टोबरला तपासणीचा एकूण आकडा साडे दहा करोडच्या पुढे गेला. भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार 27 ऑक्टोबर ला दहा लाख 60 हजार 786 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि सर्वमिळून परीक्षणाचा आकडा दहा करोड 54 लाख 887 हजार 680 वर पोचला आहे.

कोरोनाचा फैलाव मोठ्या स्तरावरुन रोखण्यासाठी देशामध्ये दिवस प्रतिदिवस याची जास्तीत जास्त तपासणी मोहिमेमध्ये 24 सप्टेंबरला एकाच दिवशी 14 लाख 92 हजार 409 नमुन्यांची विक्रमी तपासणी करण्यात आली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here