महाराष्ट्रात आतापर्यंत १०८ लाख टन साखर उत्पादन

महाराष्ट्रात या हंगामात उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. आणि अद्याप मोठ्या संख्येने कारखाने ऊस गाळप करीत आहेत.

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नागपूर विभागातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत इतर कारखानेही आपले गाळप बंद करतील.

महाराष्ट्रातील साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार १४ मार्च २०२२ पर्यंत राज्यात १३ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. सध्या कोल्हापूर विभागात १२ कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागातही एका कारखान्याचे गाळप संपुष्टात आले आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये १४ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०४६.१२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०८१.७८ लाख क्विंटल (१०८ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३४ टक्के आहे.

इंडियन शुगर मील असोसिएशनने (इस्मा) आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार, आधीच्या ११७ लाख टनाच्या तुलनेत महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात आपल्या साखर उत्पादन १२६ लाख टन (इथेनॉल रुपांतरानंतर) होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here