महाराष्ट्रात आतापर्यंत 418.66 लाख क्विंटल साखर उत्पादन; रिकव्हरी 9 टक्क्यांच्या पुढे

पुणे : गेल्या हंगामाच्या तुलनेत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन घटले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत 04 जानेवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रात साखर उत्पादनात 90.86 लाख क्विंटल (9.86 लाख टन) घट झाली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामात 04 जानेवारी 20243 पर्यंत एकूण 197 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये 97 सहकारी आणि 100 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून 463.19 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 418.66 लाख क्विंटल (41.86 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या राज्यात साखरेची सरासरी रिकवरी 9.04 टक्के आहे.

गेल्या हंगामात याचकाळात 201 साखर कारखाने कार्यरत होते. त्यांनी 540.6 लाख टन उसाचे गाळप करून 509.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रात सर्वाधिक सोलापूर विभागात आतापर्यंत ४७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. 4 जानेवारी 2024 पर्यंत सोलापूर विभागात 100.83 लाख टन उसाचे गाळप करून 83.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आणि येथे साखरेची रिकव्हरी ८.३२ टक्के आहे.राज्यात सर्वात कमी अमरावती आणि नागपूर विभागात साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. अमरावती आणि नागपूर विभागातील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here