सोलापूर : जयहिंद शुगरचे पथक करतेय शेतकऱ्यांचे प्रबोधन

सोलापूर : येथील जयहिंद शुगर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी ‘जयहिंद शुगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबवला आहे. चेअरमन गणेश माने-देशमुख व त्यांच्या संपूर्ण टिमने हा उपक्रम राबवला असून या अंतर्गत पथक शेतकऱ्यांच्या दारात जाऊन प्रबोधन करीत ऊस बिलाचे वाटप करत आहे. जयहिंद शुगरने १४ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंतच्या ऊस बिलांचे धनादेश गावपातळीवर जाऊन चेअरमन गणेश माने-देशमुख यांच्या हस्ते वाटप केले. कारखान्याला सध्या ३० कोटी रुपये वाटप करण्याची परवानगी मिळाली असून आतापर्यंत अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात नऊ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे.

जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी सांगितले की, उर्वरित ऊस बिलांचे वाटप सुरू आहे. आमच्या मोहिमेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिल मिळावे तसेच बिनव्याजी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज भरता यावे यासाठी जयहिंद परिवारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी बब्रुवान माने- देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, आर. पी. देशमुख, दत्तात्रय तोरणे, चंद्रशेखर जेऊरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here