‘सोनहिरा’ उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखेल : अध्यक्ष मोहनराव कदम

सांगली : कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी सोनहिरा कारखान्याची स्थापना केली. पारदर्शक कारभार व उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम राखत सोनहिराने देशातील एक सर्वोत्कृष्ट कारखाना असा लौकिक मिळवला आहे. उच्चांकी दर देण्याची ही परंपरा कायम राखू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले.

सोनहिरा कारखान्याच्या २०२३-२४ च्या २४ व्या गळीत हंगामाची सांगता व साखर पोत्यांच्या पूजन नुकतेच झाले. यावेळी कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते. अध्यक्ष कदम म्हणाले की, कारखान्याच्याच्या २०२३-२४ या २४ व्या गळीत हंगामात १४८ दिवस १० लाख ५९ हजार ७८० टन उसाचे गाळप झाले. ११ लाख ८२ हजार ३०९ साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. दरम्यान, कार्यकारी संचालक शरद कदम यांनी हंगामाचा आढावा घेतला. ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडी कंत्राटदार, हार्वेस्टिंग मशीन मालकांचा सत्कार करण्यात आला. संचालक पंढरीनाथ घाडगे, बापूसाहेब पाटील, युवराज कदम आदी उपस्थित होते. शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here