चिदंबरम यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली : आयएनएक्स मिडिया प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम गेल्या 5 सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. पी. चिदंबरम यांना भेटण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिहार तुरुंगात पोचल्या आहेत. चिदंबरम यांच्याशी दोघेही चर्चा करणार आहेत.

सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग हे चिदंबरम यांना भेटण्याच्या आणि चर्चा करण्याच्या दृष्टीने आज तिहार जेलमध्ये आलेले आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे, असा संदेश या भेटीतून देण्याचा हेतू सोनियाजींचा आहे. तसेच चिदंबरम यांचे पूत्र खासदार कार्ति चिदंबरम हे देखील त्यांच्या सोबत आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं उधाण आलं आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here