बिहारमध्ये गूळ, अनरिफाइंड साखर उत्पादनासाठी लवकरच धोरण: मंत्री प्रमोद कुमार

255

पाटणा : सरकार लवकरच गूळ आणि अनरिफाइंड साखर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच धोरण बनविणार आहे अशी घोषणा राज्याचे ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी विधान परिषदेत केली. साखर कारखान्यांकडील जमिनीवरील आरक्षित क्षेत्र ही श्रेणी वगळण्यात येणार आहे असे ते म्हणाले. राजदचे आमदार रामचंद्र पुरबी यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री प्रमोद कुमार यांनी उत्तर दिले.

आमदार पुरबी यांनी रीगा साखर कारखाना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले होते. पुरबी म्हणाले, शेतकऱ्यांना आपण पिकवलेला माल कमी किंमतीत विकावा लागत आहे. आरक्षित क्षेत्र असल्याने ते साखर उत्पादनाशिवाय इतर उपयोगांसाठी ऊस विकू शकत नाहीत. शेतकऱ्यांना गूळ आणि अनरिफाइंड साखर निर्मितीसाठी ऊस वापरण्याचा पर्याय दिला पाहिजे. बंद असलेल्या कारखान्यामुळे परिसरातील सुमारे ४०००० शेतकरी त्रस्त असल्याचे आमदार पुरबी म्हणाले.

तर मंत्री प्रमोद कुमार यांनी राज्य सरकार आपल्या खर्चाने येथील ऊस इतर कारखान्यांकडे पाठवित असल्याचा दावा केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here