5 आणि 1 किलोंच्या छोट्या पॅकेटमध्ये साखर विकणार कारखाना

119

रोहतक (हरियाणा) : रोहतक साखर कारखान्यात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेे. यामध्ये सोंगितले की, कारखान्यामध्ये साखरेची 5 किलो आणि एक किलो च्या छोटे पॅकेटस तयार करण्याचे काम सुरु आहे. जेेणेकरुन लवकरच, बाजारात छोट्या पॅकेटमध्ये साखर उपलब्ध होईल.

रोहतक साखर कारखान्याने आपले मोबाइल अ‍ॅप बनवले आहे, ज्यामुळे इथल्या ऊस शेतकर्‍यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखाना संचालक मानव मलिक यांनी सांगितले की, शेतकर्‍यांची सुविधा आणि पारदर्शकतेसाठी रोहतक साखर कारखान्याचे अ‍ॅप बनवले आहे, ज्यावर शेतकर्‍यांच्या ऊसाचा सर्व्हे, करार , पावत्या अणि थकबाकी भागवल्याचे विवरण ऑनलाइन वर उपलब्ध होईल. शेतकर्‍यांना पावत्यांची सूचना मोबाइल एसएमएस द्वारा दिली जात आहे. ऊसाचे वजन करण्यासाठी मानवरहित प्रणाली अवलंबण्यात आली आहे. सध्याच्या गाळप हंगामात आतापर्यंत 27.22 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना 24 जानेवारीपर्यंत ऊसाचे 54.32 करोड रुपयांची देणी दिली आहेत. ऊस शेतकर्‍यांच्या सहकार्यासाठी परिसरात शेतकरी सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी विश्राम गृहाची क्षमता दुप्पट केली आहे. कारखान्यात इथेनॉल प्लांट लावण्यासाठी सरकारकडून स्वीकृती मिळाली आहे. ज्यावर साखर कारखाना काम करत आहे.

मलिक यांनी सांगितले की, 2017-18 च्या गाळप हंगामात 17 करोड रुपयांच्या मूल्यातून अत्याधुनिक रिफइंड शुगर प्रकल्प उभारण्यात आला. राज्यात रिफाइंड साखरेचे उत्पादन करणारा पहिला कारखाना आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here