लवकरच १०० टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या : नितिन गडकरी

89

बिजनौर : शेतकऱ्यांचे जीवन बदलणे आणि त्यांना भविष्यात स्वच्छ, हरित ऊर्जेच्या उत्पादकांमध्ये बदलण्याचा दृष्टिकोन घेऊन भारतीय जनता पक्ष (भाजप) काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपच्या जन विश्वास यात्रेदरम्यान, लोकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचे व्हीजन घेऊन भाजप आला आहे. आम्ही शेतकऱ्यांना देशासाठी ऊर्जा तयार करण्यास सांगितले आहे. २००४पासून मी आपले शेतकरी ऊर्जादूत असतील असे सांगत आहे. तांदूळ, मक्का, गहू उत्पादक शेतकरी आपल्याला पेट्रोल, डिझेलला पर्याय देतील असे धोरण सरकारने ठरवले आहे. आम्ही बायो इथेनॉलवर काम सुरू केले आहे. आणि इथेनॉल पंप सुरू करीत आहोत. लवकरच १०० टक्के पेट्रोलऐवजी १०० टक्के इथेनॉलवर गाड्या चालू होतील. त्याचे फ्लेक्स इंजिन असतील, जी १०० टक्के पेट्रोल अथवा इथेनॉलवर चालतील. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळेल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, आम्ही तांदळापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ३५० कारखाने उभारले जात आहेत. एक टन तांदळापासून ३८० लिटर इथेनॉल निर्मिती होऊ शकते. यासोबतच उसाचा रस काढल्यानंतर जी चिपाडं शिल्लक राहतात, त्यांचा वापर ग्रीन हायड्रोजन तयार करण्यास होऊ शकतो, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here