दक्षिण आफ्रीका: देशातील हिंसाचारामुळे साखर उद्योगाला फटका

केप टाउन : माजी राष्ट्रपती जेकब जुमा यांना तुरुंगवासात पाठविण्यात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार भडकला आहे. साखर उत्पादनाचे मुख्य क्षेत्र असलेल्या क्वाजुलू नटालमध्ये आंदोलनकर्त्यांनी ऊसाने भरलेले ट्रक पळवून नेले. याशिवाय, ऊसाची शेती जाळून टाकली. साखर उद्योगातील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३ लाख टन ऊस जाळून टाकला आहे. दक्षिण आफ्रिकेतील शेतकरी अनेक दिवसांपासून अशांतता आणि लुटमारीला सामोरे जात आहेत. उत्पादन घेऊन जाणारे ट्रक बाजारात रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धान्य, खाद्यपदार्थांच्या तुटवड्याची धास्ती आहे.
माजी राष्ट्रपती जेकब जुमा यांना गेल्या आठवड्यात तुरुंगात टाकल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांशी संघर्ष सुरू केला आहे. शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड केली जात आहे. या दंगलीत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील प्रमुख राज्यमार्ग बंद आहेत. देशाचे मुख्य कृषी संस्था अॅग्रीसाचे कार्यकारी संचालक क्रिस्टो वॅन डेर रीडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आपला शेतीमाल स्थानिक बाजारपेठ, दुकानदारांकडे पोहोचवता येत नाही. अॅग्रीसाच्या शेतकऱ्यांनी आधीच पिकांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिका क्रेनग्रोवर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस फन्के यांनी सांगितले की आतापर्यंत ३ लाख टन ऊस जाळण्यात आला आहे. साखर उत्पादक तोंगाट हुलेट यांनी सांगितले की, आता त्यांचे कारखाने, रिफायनरी बंद आहे. साइट्रस ग्रोअर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन चाडविक यांनी सांगितले की, साइट्रसची निर्यातही रोखण्यात आली आहे. डर्बन बंदराला जाण्यासाठी रस्त्याचा वापर करणे अशक्य आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here