साखर कारखान्यांतील मशिनरीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाला वेग

बाजपूर : कुमाऊं येथील विभागीय आयुक्तांनी दुपारनंतर सहकारी साखर कारखाना आणि इतर आसवनीची पाहणी केली. कारखान्यातील मशिनरीच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी केली. ऊस गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यात यावा यासाठी कामात सातत्य राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महिला कामगारांनी त्यांना प्रती दिन १९० रुपये मजूरी मिळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सरकारच्या जाहीर दरानुसार मजुरी देण्याचे निर्देश दिले.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी एडीएम जय भारत सिंह, साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक हरवीर सिंह, एसडीएम आर. सी. तिवारी, तहसीलदार युसुफ अली, सीओ वंदना वर्मा, मुख्य ऊस विकास अधिकारी डॉ. राजीव अरोरा, मुख्य अभियंता विनीत जोशी, आसवनी इन्चार्ज अतुल चौहान, वीरसेन राठी आदी उपस्थित होते. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या यूथ ब्रिगेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद यादव यांच्या नेतृत्वाखालील काही युवकांनी कारखान्याच्या अतिथीगृहात विभागीय आयुक्त दीपक रावत यांची भेट घेऊन निवेदन दिले. बाजपूर येथे कायमस्वरुपी अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. अमित कुमार, अरविंद दिवाकर, उज्ज्वल सिंह, गौरव आर्य आदी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राजेश कुमार यांनीही आयुक्तांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here