श्रीसंत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत ८३.४४ टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना २१ संचालक पदासाठी रविवारी (दि. ११) तालुक्यातील २२ मतदान केंद्रावर ८३.४४ टक्के मतदान झाले. ६ हजार ६६९ पैकी ५ हजार ५६५ मतदारांनी मतदान केले. दरम्यान, सोमवार पैठण शहरातील एका मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत सी.ए सचिन घायाळ, चेअरमन तुषार सिसोदे यांच्या पॅनलचे सहा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई, विष्णू रोडगे, अशोक जाधव यांच्या देखरेखीखाली मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत मतदार असलेले पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण येथे आपला मतदानाचा हक्क बजविला तर कारखाना चालविणारे पॅनल प्रमुख सचिन घायाळ, ज्येष्ठ संचालक विक्रम काका घायाळ, चेअरमन तुषार पाटील यांनी आपापल्या मतदारसंघात मतदान केले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि ईश्वर जगदाळे, शरदचंद्र रोडगे, सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, संजय मदने, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, नरेंद्र अंधारे, शिंदे, राजेश आटोळे, कर्तरसिंग सिंगल यांनी बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here