श्रीलंका: गोदामांतून ४,१०० मेट्रिक टन साखर जप्त

कोलंबो : श्रीलंकेत साखरेच्या वाढत्या दरामुळे सुरू झालेल्या साठेबाजीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्राहक व्यवहार प्राधिकरणाने (सीएए) केरलापिटीया, वट्टाला येथील एका गोदामावर छापा टाकून तेथे साठेबाजी करून ठेवलेली ४,१०० मेट्रिक टन साखर जप्त केली आहे. सहकारी सेवा, वितरण आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री लसंथा अलगियावन्ना यांच्या म्हणण्यानुसार, गोडावून्सच्या मालकांना गोदामाच्या नोंदणीची कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे गोदामांमध्ये साखर साठवून ठेवण्याचा अधिकार आहे की नाही याची माहिती मिळू शकेल.

राज्य मंत्री लसंथा अलगियावन्ना यांनी सांगितले की, जर गोदामांची नोंदणी सीएएकडे केलेली नसेल तर याच्या मालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक आयातदारांनी साखरेच्या दरवाढीनंतर आपल्याकडील साठा लपवून ठेवला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ग्राहक व्यावहार प्राधिकरणाने साखरेचे साठे ताब्यात घेण्यासाठी खास अभियान सुरू केले आहे. सीएएकडून पश्चिम विभागात सातत्याने छापेमारी सुरू राहील आणि यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करताना हयगय केली जाणार नाही असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here