श्रीलंका : आयात ७,००० टन साखर बंदरातच पडून

कोलंबो : पाच महिन्यांपूर्वी आयात केलेली साखर बंदरात येऊन अडकली आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार साखर आयातदार असोसिएशनचे (एसआयए) उपाध्यक्ष निहाल सेनेविरत्ने यांनी सांगितले की, बंदरात आयात केलेली जवळपास ३०० कंटेनरमध्ये ७,००० मेट्रिक टन साखर आहे. आयात शुल्क भरण्यास उशीर झाल्याने ही साखर वितरण करण्यास विलंब झाला आहे.

जवळपास पाच महिन्यांपूर्वी पाच आयातदारांनी ४०० कंटेनरमध्ये १२,००० टन साखर आयात केली होती. मात्र, सरकारने साखर आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याने तसेच डॉलरच्या तुटवड्यामुळे हा साखर साठा पुढे वितरीत करण्यात अडचणी आल्या. आता व्यापार मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर आयात करण्यात आलेली साखर सातोसा नेटवर्कला सोपविण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी यापैकी ५,००० टन साखर देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here