श्रीलंकेत इथेनॉल आयातीवर निर्बंधांमुळे लंका शुगरला फायदा

678

कोलंबो : इथेनॉल आयातीवर निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर लंका शुगर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आता नफा कमावत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. इथेनॉल आयातीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर सातत्याने तोट्यात असलेल्या लंका शुगर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने नफा मिळवला आहे.

लंका शुगर कंपनीच्या अध्यक्षांनी राष्ट्रपती गोतबया राजपक्षे यांच्यासमवेत राज्यातील उद्योगांच्या प्रमुखांच्या बैठकीत सांगितले होते की, कंपनीने गेल्या वीस वर्षांपासून करारावर असलेल्या सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले आहे. त्यांना पदोन्नती आणि बोनस आदी लाभ देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here