श्रीलंका: सरकारकडून साखरेचा किरकोळ विक्री दर निश्चित

253

कोलंबो : सरकारने खाद्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी आणि व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनेंतर्गत साखर आणि तांदुळाची किरकोळ विक्री किंमत निश्चीत केली आहे. सफेद साखरेचा (पॅकिंग) एक किलोचा दर १२५ रुपये, तर पॅक न केलेली साखर १२२ रुपये किलो असा दर राहील. ब्राउन शुगरचा (पॅकिंग) दर १२८ रुपये प्रती किलो आणि पॅकिंग न केलेल्या साखरेचा दर १२५ रुपये किलो असा असेल.

मे महिन्याच्या मध्यावधीपासून सरकारने कोणतेही आयात परवाने दिले नसल्याने साखर एमआरपीपेक्षा जास्त २०० रुपये दराने विक्री केली जात होती. बुधवारी सरकारने अनेक गोदामांवर छापे टाकून २९,००० टन साखर जप्त केली आहे. ही साखर ग्राहकांना विक्री करावी असे निर्देश दिले आहेत. मात्र, गोदाम मालकांनी दावा केला आहे की, सरकारच्या निर्देशानुसार सर्व गोदामे आणि साठा याविषयी ग्राहक व्यवहार प्राधिकरणाबाबत सूचना देण्यात आली आहे. आणि त्यांच्यासोबत योग्य व्यवहार करण्यात आलेला नाही असा आरोप गोदाम मालकांनी केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here