श्रीलंका: साखर आयीतीसाठी डॉलर्स जारी करण्याचे आयातदारांचे आवाहन

कोलंबो : श्रीलंकेतील साखर आयातदारांनी ग्राहक संरक्षण मंत्री लसंथा अलगियावन्ना यांना साखर आयातीसाठी बँकांना आवश्यक डॉलर्स जारी करावेत असे आवाहन केले आहे.

साखर आयातदार संघाचे उपाध्यक्ष निहाल सेनेविरत्ने यांनी सांगितले की, असे केल्याने साखर आयात नियमित होऊ शकते. तसेच त्याला निश्चित केलेले मूल्य देणे शक्य होणार आहे. मंत्री लसंथा अलगियावन्ना आणि साखर आयातदार संघाच्या सदस्यांसोबत याविषयी चर्चा करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्राहक व्यवहार प्राधिकरणाने अलिकडेच साखरेचा दर निश्चित केला आहे. एक किलो सफेद साखरेला Rs. 122 आणि एक किलो ब्राउन शुगरला Rs.125 दर निश्चित करण्यता आला आहे. जरी साखरेचा दर निश्चित केला असला तरी बहुतांश स्टोअर्समधून या दराने साखर विक्री केली जात नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here