विदेशी मुद्रा संकटामध्ये श्रीलंकेचा साखर आयातीवर प्रतिबंध

कोलंबो: श्रीलंकेच्या अर्थ मंत्रालयाने देशातील विदेशी मुद्रा संकटाला पाहून तांदूळ, आटा, साखर, मद्य आणि इतर वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध घातला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी डॉलर समोर श्रीलंकन रुपयाच्या मूल्यातील घट पाहून श्रीलंकेने हे पाऊल उचलले आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया 200.46 रुपये इतक्या खाली आला होता.

अर्थमंत्रालयाने सांगितले की, सीमा शुल्क विभाग आणि वाणिज्यिक बँकांनी 156 प्रकारच्या उत्पादनांच्या आयातीला सस्पेंड केले आहे. त्यानुसार तांदूळ, कणिक, साखर, बेकरी उत्पादन आणि फर्निचर सारख्या उत्पादनांना लेटर्स ऑफ क्रेडिट, स्विकृत दस्तऐवज, थकबाकी भागवण्याचे दस्तावेज आणि पुढील थकबाकी भागवण्या अंतर्गत आयात केले जाऊ शकत नाही.

श्रीलंकेला आपला घरगुती वापर पूर्ण करण्यासाठी आयातीवर निर्भर राहावे लागत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here