श्रीलंका: साखर घोटाळ्यात सरकारवर केलेले आरोप खोटे असल्याचा मंत्री महिंदानंद यांचा दावा

82

कोलंबो : साखरेवरील आयात शुल्क कमी करण्याच्या प्रकरणात साखर घोटाळा झालेला नाही असे मंत्री महिंदानंद अल्थगामेज यांनी सांगितले. सरकारवर लावलेले आरोप खोटे आहेत असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे सरकारने कोणत्याही प्रकारची लूट केलेली नाही, कोणत्याही घोटाळ्याला पाठीशी घातलेले नाही असा विश्वास बाळगा असे मंत्री महिंदानंद म्हणाले.

दरम्यान, माजी सभापती कारू जयसूर्या यांनी सांगितले की, सार्वजनिक वित्त आणि कोषागार समितीने घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे. आयात साखरवर कर कमी झाला होता. ज्यावेळी आयात केलेला माल बेटावर आला, तेव्हा त्यावरील कर कमी केला गेला. आणि हा माल देशाबाहेर गेल्यावर कर वाढविण्यात आला. याची चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींना शिक्षा केलीच पाहिजे असे जयसूर्या म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here