श्रीलंका: बंदर प्राधिकरण साखरेचे ५०० कंटेनर Lanka Sathosaला देणार

कोलंबो : बंदर प्राधिकरणाने साखरेचे सुमारे ५०० कंटेनर लंका सथोसाला (Lanka Sathosa) देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर आयातदार असोसिएशनने सथोसाला साखरेचे कंटेनर उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दिली असल्याची माहिती साखर आयातदार संघाचे उपाध्यक्ष निहाल सेनेविरत्ने यांनी दिली.

जेव्हा साखरेच्या आयातीवर निर्बंध लागू करण्यात आले होते, तेव्हा या साखरेची आयात करण्यात आली होती, अशी माहितीही साखर आयातदार संघाचे उपाध्यक्ष सेनेविरत्ने यांनी दिली. यादरम्यान, लंका सथोसाचे अध्यक्ष (निवृत्त) रिअर अॅडमिरल आनंद वीर सिकेरा यांनी सांगितले की, याबाबत साखर आयातदारांशी चर्चा केली जाणार आहे. यासंबंधीच्या बैठकीदरम्यान सथासाकडून हा साखरेचा साठा कोणत्या किमतीला खरेदी करायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय, सथोसाकडून मिळालेला साखर साठा लवकरच देशभरात वितरीत केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here