श्रीलंका: नफेखोरी रोखण्यासाठी साखर आयातीवर येणार निर्बंध

299

कोलंबो : साखर आयातदारांकडून सुरू असलेली नफेखोरी रोखण्यासाठी सरकारने साखरेच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती श्रीलंकेच्या लघू निर्यात पीक राज्यमंत्री जनक वक्कुम्बुरा यांनी दिली. साखरेच्या आयातीवर होणारा खर्च ९.२० रुपये प्रती किलो असून आयात टॅक्समधील ५० रुपयांच्या वाढीसह साखरेची किंमत १५० रुपये किलोवर पोहोचेल. त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे, असे मंत्री वक्कुम्बुरा म्हणाले.

मंत्री वक्कुम्बुरा म्हणाले, दरवाढीचा फायदा आयातदार व्यापारी उचलतील आणि साखरेचा जुना साठा नव्या दराने विक्री केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होईल. त्यासाठी साखरेचा उपलब्ध साठा ११७ रुपये प्रती किलो दराने सतोसा आणि सहकारी स्टॉल्सच्या माध्यमातून वितरण केला जाणार आहे. त्यासाठी पावले उचलली जातील.
अलिकडेच देशातील साखरेचा साठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना अशा प्रकारचे साठेबाजी रोखण्यासाठी ग्राहक व्यवहार प्राधिकरणाने (सीएए) आपल्याकडे नोंदणी करण्यास सांगितले होते. सीएए नोंदणीकरण केल्याशिवाय, साखर आयातदार, उत्पादक, कारखान्यांचे मालक, दुकानदार, वितरक यांना घाऊक विक्री करण्यास निर्बंध लागू करण्यात आले. याशिवाय साखरेचा साठाही करण्यास मनाई करण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here