‘श्रीनाथ म्हस्कोबा’तर्फे एकरी १०० टनाहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या जीवनात गोडी आणली, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्यावतीने एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व कारखान्याशी निगडीत ५१ जोडप्यांच्या हस्ते संकल्प महायज्ञ कार्यक्रमाप्रसंगी आयोजित कीर्तनात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, श्री.सदगुरू शांतीनाथजी महाराज, बाळासाहेब चौगुले, प्रताप महाराज चव्हाण, जयश्री बोव, संभाग, कारखान्याचे संचालक माधव राऊत, महेश करपे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, एस. बी. टिळेकर आदी उपस्थित होते.

खोडवा ऊस पिकात एकरी ७९ टन उत्पादन घेणाऱ्या अलका शहाजी चोंधे यांचा ‘ऊस लक्ष्मी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एकरी शंभर टन उत्पादन घेतल्याबद्दल नाना केरू वडघुले (टाकळी भीमा), संतोष कुलाळ (वडगाव ), श्वेताली कड (केडगाव), ज्ञानेश्वर मगर (देवकरवाडी), प्रवीण जगताप, सोमनाथ शिंदे, किसन शिंदे (राहू), तानाजी मेमाणे (वडगाव बांडे), दशरथ टेळे (टेळेवाडी), राजेंद्र कदम (खुटबाव), अनिल जांभुळकर (लडकतवाडी), आबासाहेब टेळे (टेळेवाडी), अजय शितोळे (रांजणगाव सांडस), सुनील कुंभार (रांजणगाव सांडस), राहुल अवचट (यवत स्टेशन) तानाजी हंबीर (पाटेठाण), दीपक ताम्हाणे (भरतगाव), नागेश कोंडे (वढू खुर्द). रमणलाल लुंकड (वडगाव रासाई), अशोक डुकरे (वढू खुर्द), यांना ‘ऊस श्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, खोडवा ऊस पिकामध्ये ७५ टनांहून अधिक ऊस उत्पादक घेणाऱ्या गणेश वायकर (पिंपरी सांडस), सुनीता थोरात (नाथाचीवाडी) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या शेतकऱ्यांना डी. एस. टी.ए. चे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. चव्हाण व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ, एस.बी. टिळेकर यांनी मार्गदर्शन केले. गणेश टेमगिरे यांनी सूत्रसंचालन तर योगेश ससाणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here