स्योहारा साखर कारखान्यात गाळप सुरू

105

स्योहारा : अवध साखर कारखान्यात पूजन करून गळीत हंगामाला प्रारंभ करण्यात आला. सर्वात पहिल्यांदा ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

साखर कारखान्याचे लेखा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष अजय त्रिपाठी, कार्यकारी अध्यक्ष सुखबिर सिंह, तांत्रिक विभागाचे उपाध्यक्ष राजीव त्यागी, प्रॉडक्शन विभागाचे उपाध्यक्ष सुशील कुमर शर्मा यांनी पूजन करून छोट्या युनिटमध्ये ऊस टाकून पूजा केली. कार्यकारी अध्यक्ष सुखविर सिंह यांनी सांगितले की, कारखाना पूर्ण क्षमतेने ऊस गाळपासाठी तयार आहे. साखर कारखान्याच्या प्रशासनाने कुरी फार्म येथील शेतकरी हरपाल सिंह यांच्या बैलगाडीला झूल लावून रोख बक्षिस, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. मुख्य इंजिनीअर प्रमोद कालिया, धर्मेंद्र सिंह, ऊस विभागाचे उपाध्यक्ष बलवंत सिंह, क्वालिटी मॅनेजर पंकज भारती, भाकियूचे विभागीय अध्यक्ष गजेंद्र सिंह टिकैत, उबेदुर्रहमान , भाजप मंडल अध्यक्ष नेपाल सिंह, डॉ. अभय वीर ढाका, उज्ज्वल चौहान, काँग्रेसचे नेते चौधरी फहीम उर रहमान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here