ऊस शेतकर्‍यांच्या हितार्थ राज्य सरकार साखर उद्योगाबरोबर राहणार: उद्धव ठाकरे

पुणे : महाराष्ट्रात साखर उद्योग अडचणीत आहे. सरकार साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी महत्वाची पावले उचलणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यात साखर उद्योगासमोर अनेक समस्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी सरकार तज्ञांची एक समिती गठीत करणार आहे. शिवाय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी याबाबत एक ठोस धोरण बनवणार आहे.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय ) च्या 43 व्या सर्वसाधारण सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी व्हीएसआय चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार राज्यातील शेतकर्‍यांच्या हितार्थ साखर उद्योगासोबत आहे. व्हीएसआय ने साखर उद्योगासाठी मोठे योगदान दिले आहे, ज्यामुळे साखर उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये उच्चपातळी वर उभा आहे. सध्या या उद्योगापुढे अनेक समस्या आहेत. त्यांना सोडवण्याच्या दृष्टीने सरकार एक तज्ञांची समिती नेमणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी साखर उद्योग वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर देत सांगितले की, साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी सरकार बरोबरच साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांची एकजूट होणेदेखील गरजेचे आहे. त्यांनी मराठवाड्यात व्हीएसआय ची शाखा सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबतही सांगितले.

यावेळी नामदार जयंत पाटील, नामदार बाळासाहेब थोरात, विजयसिंह मोहिते पाटील, व्हीएसआय उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार ,विविध कारखान्याचे अध्यक्ष व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here