“इथेनॉल उत्पादन व GST नियमांचे पालन” याविषयावरती राज्यस्तरीय चर्चासत्राचे 8 फेब्रुवारीला आयोजन

कोल्हापूर : आर्थिक अडचणीत असणाऱ्या साखर उद्योगासाठी इथेनॉल हा एक उत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे. साखरेचे दरवर्षी वाढते अतिरिक्त उत्पादन आणि साठा नियंत्रित करणे तसेच कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने येत्या काही वर्षांत आणखी इथेनॉल निर्मिती क्षमता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2030 पर्यंत साखरेचे दर नियंत्रित व मजबूत करणे आणि पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ही बाब महत्वाची आहे. यासाठी बर्‍याच पेट्रोलियम कंपन्या पुढे सरसावल्या आहेत.

या वेळी साखर कारखानदारांनी इथेनॉलवर जोर धरला आहे आणि साखर उद्योगासाठी इथेनॉल कसे अमृत सिद्ध होईल याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी सर्व साखर कारखानदार उत्सुक आहेत. केडीएएम असोसिएट्सच्या वतीने 8 फेब्रुवारी 2020 रोजी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्व भागधारकांसाठी राज्यस्तरीय “साखर क्रांती 2020” परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात पॅनेलच्या तज्ज्ञांकडून “इथनॉल मॅन्युफॅक्चरिंग आणि भविष्यातील युक्त्या” यावर चर्चा केली जाणार आहे.

चिनीमंडी डॉट कॉमशी बोलताना श्री आशिष देशमुख – पार्टनर- केडीएएम असोसिएट्स यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, GST कायद्याच्या नियम ४२ / ४३ चे योग्य आकलन झाल्यास साखर कारखान्यांच्या कार्यकारी भांडवलात मोठ्या प्रमाणात बचत होईल. GST कायद्याच्या नियम ४२ / ४३ या वरती GST तज्ज्ञ सीएमए महिंद्रा भोम्बे यांचे एक वेगळे सत्र होईल. बुजी शुगर ( मोजाम्बिक, अफ्रीका) चे निदेशक हे श्री जयदीप “कार्यशील पूंजी व्यवस्थापन” या विषयावरती आपले विचार मांडतील.

ते म्हणाले की, या कार्यक्रमादरम्यान प्रख्यात वक्त्यांचा एक गट असेल ज्यात ग्लोबल ट्रेंड, ऑटोमेशन इन शुगर इंडस्ट्री इत्यादी विषयांवर चर्चा केली जाईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. ना. बाळासाहेब पाटील, मंत्री (सहकार व पणन) आणि महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या हस्ते होणार आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्रातील साखर उद्योगातील एम. डी, मुख्य लेखाकार, डिस्टिलरी मॅनेजर्स, अभियांत्रिकी प्रमुख इत्यादींसाठी खुला आहे. नोंदणी किंवा अधिक तपशीलांसाठी 7758060463 या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here