राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याला भेट

अहिल्यानगर : राज्याचे नूतन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्याकडून त्यांनी कारखान्यातील विविध प्रयोगांची माहिती घेतली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यावतीने सुतार यांच्या हस्ते डॉ. खेमनार यांचा सत्कार केला.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रदीर्घ साखर उद्योगातील तंत्र आत्मसात करीत कारखान्यात सातत्याने नवनवे तंत्रज्ञान आणले. शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी ऊस उत्पादन वाढीसह साखर उतारा चांगला कसा राहिल, याबाबत सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विविध रासायनिक उपपदार्थ प्रकल्प यशस्वी करून दाखविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here