लक्ष्मीगंज साखर कारखाना सुरू करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांना निवेदन

पडरौना : शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेला लक्ष्मीगंज साखर कारखाना सुरू करावा या मागणीचे निवेदन भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हा महामंत्री शत्रुघ्न प्रताप शाही यांनी ऊस आणि साखर उद्योग मंत्री सुरेश राणा यांना दिले.
याबाबतच्या निवेदनात भाजप नेते शाही यांनी म्हटले आहे की, लक्ष्मीगंज साखर कारखाना सुरू असताना तो २००७-०८ मध्ये बंद करण्यात आला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४० गावे असून दहा किलोमीटरचे क्षेत्र यामध्ये येते. लक्ष्मीगंज ऊस सहकारी समितीच्या कार्यक्षेत्रात ७२०० हेक्टरमध्ये ऊस शेती केली जाते. हा ऊस इतर कारखान्यांना पाठवला जातो. २०१८-१९ मध्ये ऊस समित्यांकडून २६.५० लाख क्विंटल, २०१९-२० मध्ये २६.११ लाख क्विंटल आणि २०२०-२१ मध्ये २१.५४ लाख क्विंटल ऊस इतर कारखान्यांना पाठविण्यात आला आहे.

शाही यांनी ऊस मंत्री राणा यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितामध्ये साखर कारखाना नव्याने सुरू केला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. जवळपास १००० युवकांना रोजगार उपलब्ध होईल. लक्ष्मीगंज बाजारातील व्यापाऱ्यांना फायदा होईल. तसेच साखर कारखान्याकडे ४५ एकर जमीन अद्याप उपलब्ध असल्याचे त्यांना मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here