साखर कारखाना सुरू करण्यासाठी निवेदन

244

मथुरा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणी सदस्य भगवतस्वरुप पांडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार राज्यमंत्री व्ही. एल. वर्मा यांना छाता साखर कारखाना सुरू करण्याबाबत निवेदन दिले. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना या विषयाचे निवेदन दिले.

बहुजन समाज पक्षाच्या सरकारने छाता साखर कारखाना बंद केला होता. गेली दहा वर्षे हा कारखाना सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ती पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यांनी सांगितले की, विधानसभेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी राजनाथ सिंह, संजीव बालियान, खासदार हेमामालीनी आदी नेत्यांनी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, आजअखेर याविषयी कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या विभागात एक लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. जर साखर कारखाना सुरू करण्यात आला नाही तर आगामी निवडणुकीत याचे विपरीत परिणाम होऊ शकतात असेही त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here