बुस्टर डोस : राज्यातील २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय जमीन कसण्यासाठी राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार आहे. एकूण २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.

या यादीमध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांना मानणाऱ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे समजते.सहकारी कारखान्यांना एनसीडीसीमार्फत थकहमी कर्ज देण्यात येणार आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमनसोबत बेठक  पार पडली. कारखानदारांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे -पाटील, अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्या कारखान्यांना मिळणार कर्ज…
– सुंदरराव सोकूखे सहकारी साखर कारखाना बीड
– संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
– वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी, अहमदनगर
– लोकनेते मारुतीराव घुले सहकारी साखर कारखाना, नेवासा
– किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई
– क्रांतिवीर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना वाळवा, सांगली
– किसन वीर सहकारी साखर उद्योग खंडाळा, सातारा
– अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर, अकोले
– कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट
– मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, नेवासा
– शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव
– तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
– रावसाहेब पवार घोडगांगा सहकारी साखर कारखाना, शिरूर
– राजगड सहकारी साखर कारखाना, भोर
– विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, मुरुम भाजपा बसवराज पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here