शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही विक्रमी पातळीवर; निफ्टी बँक 53,000 च्या जवळ

मुंबई: भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी 26 जून रोजी सलग दुस-या सत्रात उसळी घेतली, निफ्टीने प्रथमच 23,850 चा टप्पा पार केला. निफ्टी 147.50 अंकांनी किंवा 0.62 टक्क्यांनी वाढून 23,868.80 वर पोहचला.काहीशा धीम्या सुरुवातीनंतर पहिले काही तास बाजार स्थिर राहिला. तथापि, दुपारच्या सत्रात वेग आला आणि बँका, तेल आणि वायू आणि एफएमसीजी समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी गेनर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा समावेश होता. तर अपोलो हॉस्पिटल्स, बजाज ऑटो, एम अँड एम, टाटा स्टील आणि हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये पडझड पाहायला मिळाली.बँक, ऑइल अँड गॅस, टेलिकॉम, मीडिया आणि एफएमसीजी 0.3-2 टक्क्यांनी वधारले, तर ऑटो, मेटल आणि रियल्टी 0.7-1.5 टक्क्यांनी घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here