शेअर बाजार: सेन्सेक्सचा नवा उच्चांक, आयटी, ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी

नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये बुधवारी जोरदार तेजीचे सत्र पहायला मिळाले. आयटी, फायनान्स आणि ऑटोमोबाइल कंपन्यांच्या शेअर्सच्या तेजीमुळे शेअर बाजार उच्चांकी स्तरावर बंद झाला. बीएसईच्या ३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स ३९३.८३ अंकांनी, म्हणजे ०.८० टक्के वाढून ४९,७९२.१२ अंकांवर क्लोज झाला. तर एनएसईकडील निफ्टी १२३.५० अंक म्हणजे ०.८५ टक्क्यांनी वाढून १४,६४४.७० या स्तरावर क्लोज झाला.

निफ्टीमध्ये टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, विप्रो, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी या शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ पहायला मिळाली. तर पॉवरग्रीड कार्पोरेशन, श्री सिमेंट्स, एनटीपीसी, गेल आणि एसबीआय लाइफ हे शेअर्स घसरून क्लोज झाले. सर्व सेक्टर्सचे इंडेक्स बुधवारी वाढून क्लोज झाले. ऑटो, आयटी आणि पीएसयू बँक इंडेक्समध्ये दोन-दोन टक्क्यांची वाढ दिसून आली.

बीएसई सेन्सेक्सवर टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त, म्हणजे २.६५ टक्क्यांची वाढ दिसून आली. मारुतीच्या शेअर्समध्येही २.४८ टक्क्यांची तेजी दिसून आली. तर एशियन पेंट्सचे शेअर्स १.८७ टक्क्यांनी वाढून क्लोज झाले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, एसबीआय, टीसीएस, ऍक्सि बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, टायटन, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज ऑटो या कंपन्यांचे शेअर्स प्लसमध्ये क्लोज झाले.

दुसरीकडे पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये २.२० टक्के घट पहायला मिळाली. याशिवाय एनटीपीसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले इंडिया, सन फार्मा, हिंदूस्थान युनीलिव्हर लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅब हे शेअर्स लाल निशाणात बंद झाले. याआधीच्या सत्रात सेन्सेक्स ४९३९८.२९ या स्तरावर क्लोज झाला होता. बुधवारी बीएसई सेन्सेक्स वाढून ४९,५०८.७९ अंकावर ओपन झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here