शेतकऱ्यांच्या थकबाकीसाठी महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. तालुका शिवसेनेच्या वतीने, मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ या वर्षातील २५० रूपयांचे बील अजूनही शेतकऱ्यांना दिले नाही. त्यात भर म्हणजे हंगाम २०१८-१९ या वर्षातील थकित ऊस बील एफ.आर.पी. प्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही. आजघडीला जय महेश कडे शेतकऱ्यांंची ५० कोटी रुपयांची ऊस बिले थकित आहेत. त्याचप्रमाणे २०१७-१८ ची २५० रुपये फरकाची थकित बिले २०१८-१८ या वर्षाची एफ.आर.पी.ची थकीत बिले सुद्धा आहेत. ती तात्काळ अदा करण्यात यावीत यासाठी कारखाना प्रशासनाच्या धोरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, जिल्हा सचिव रामदास ढगे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागळे, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. दत्ता रांजवण, उपतालुका प्रमुख नामदेव सोजे, उपतालुका प्रमुख अतुल उगले, तालुका सचिव पप्पू धरपडे, विठ्ठल जाधव, विक्रम सोळंके, अमोल डाके, दासू पाटील बादाडे, रमेश खामकर, मुंजाबा जाधव, सुंदर विके, सचिन दळवी, सतीश बोटे, कल्याण बल्लाळे, रवि आळणे, सर्कलप्रमुख महादेव सुरवसे, संभाजी पास्टे, सुखदेव धुमाळ, प्रकाश सोळंके, अशोक पास्टे, संदीप ढिसले, गजानन गिराम, करण थोरात,अशोक नाईकनवरे, गोविंद शिंदे, शिवसैनिक, शेतकरी सहभागी होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here