5000 रुपये महिना कमावणार्‍या 797 गरीबांनी खरेदी केल्या करोडोंच्या जमिनी

आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसापासून राजधानीच्या प्रकरणात शासन गरम आहे. तीन राजधानी च्या समस्येवरच्या वादादरम्यान आंध्र प्रदेशातून जमीन घोटाळ्याचे एक असे प्रकरण समोर आले आहे, जे हैराण करुन टाकेल. 797 व्यक्तींनी जवळपास 200 करोड रुपयांच्या किमतीची 700 एकर जमीनी खरेदी केल्या आहेतत्यांचे उत्पन्न केवळ 5000 रुपये महिना आहे. याचा खुलासा स्वत: सीआईडी यांनी केला आंध्र प्रदेशामध्ये जमीन घोटाळ्यांच्या या सनसनाटी प्रकरणात राज्याच्या सीआईडी यांनी जवळपास 797 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सीआईडी तपासणीमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, अमरावती क्षेत्रामध्ये जवळपास 200 करोड रुपये मूल्य असणार्‍या 700 एकर जमीनी असणार्‍या प्लॉट मालकांची मासिक कमाई 5 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. याशिवाय, यामध्ये अधिक लोकांकडे पॅन कार्ड देखील नाही. अमरावतीमध्ये 2014-2015 च्या दरम्यान जमीनी खरेदी केल्याआहेत.

आंध्र प्रदेश च्या गुन्हे तपास विभाग यांनी सीआईडी यांनी सन 2014 आणि 2015 दरम्यान अमरावती राजधानी क्षेत्राच्या 5 विभागातील अवैध रुपातील जमीन खरेदी-विक्री मध्ये लुप्त झाल्यामुळे टीडीपी चे माजी मंत्री पृथ्वीपती पुल राव पी नारायण आणि 797 पेक्षाही अधिक लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सीआईडी चे एडीजी सुनील कुमार यांनी सांगितले की, 797 व्यक्तींनी 200 करोड रुपयापेक्षा जास्त किमतीची 700 एकर जमीन खरेदी केली आहे. या सर्व व्यक्तींनी आपली कमाई प्रति महिना 5,000 रुपये पेक्षाही कमी घोषित केली आहे, त्यामुळे निश्‍चितपणे हे संदिग्ध आहे आणि यांची देवाणघेवाणही संदिग्ध आहे. त्यांनी पुढे सांगितले की, यामधील जवळपास 500 लोकांकडे पॅन कार्डदेखील नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here