बलरामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त

बलरामपूर: बलरामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी संपला. या हंगामात एक करोड 62 लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आले. 372.83 करोड रुपये ऊस बिल शेतकर्‍यांना दिले गेले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष मधुकर मिश्रा यंनी सांगितले की, यावेळी 17 लाख पोत्यांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. लॉकडाउनच्या अवधीमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवण्याच्या नियमाचे पालन करुन ऊस खरेदी करण्यात आला आहे. 22 मार्च पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे पैसे देण्यात आले आहेत. प्रमुख व्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी कारखान्याचे अधिक़ारी, कर्मचारी तसेच शेतकर्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी कारखान्याचे निदेशक डॉ. अरविंद कृष्ण सक्सेना, ऊस प्रमुख व्यवस्थापक राजीव गुप्ता, एन.के. दुबे, विनोद कुमार मलिक, एसडी. पांडये, वीरेंद्रप्रताप सिंह, बी.एन. ठाकूर, डी.एस. चौहान, उदयवीर सिंह, संताषकुमार व श्रमकल्याण अधिकारी एस.पी. सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here