साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी कोरोना फाइटर्सचा केला सन्मान

150

बलरामपूर : तुलसीपूर साखर कारखान्याकडून बुधवारी वृत्तपत्र वितरक आणि सफाई कामगारांना खाद्य पदार्थ आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले. कारखान्याच्या अधिकार्‍यांनी वितरकांचा कोरोना फाइटर्स अशा शद्बात गौरव करुन पुढेही आमचे सहकार्य राहिल असे सांगितले.

बुधवारी सकाळी कारखाना परिसरात वृत्तपत्र वितरक आणि सफाई कामगारांना बोलवण्यात आले. एसडीएम विनोद सिंह यांनी कारखान्याच्या या सहकार्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, कोरोना वायरसच्या लढाईत वृत्तपत्र वितरक आणि सफाई कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. प्लांट प्रमुख योगेश कुमार सिंह यांनी सांगितले की, या आपत्तीत वृत्तपत्र वितरक आणि सफाई कर्मचारी जिव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम. मुख्य व्यवस्थापक आशीष प्रतापसिंह, वाणिज्यिक व्यवस्थापक राजन कुमार, पूर्व ब्लॉक प्रमुख सत्यनरायण मिश्र, वीएस चौहान, नरेंद्र कुमार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना व सफाई कामगारांना धन्यवाद दिले. तसेच त्यांना रेशन चे साहित्य दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here