ऊसाच्या शेतात आग, लाखोंचे नुकसान

87

हमीरपूर(उत्तर प्रदेश): क्षेत्रातील गाव बिलरख मध्ये हाईटेंशन तारांच्या स्पार्किंगमुळे शेतकर्‍याचे उभे असणार्रे ऊसाचे पीक जळून खाक झाले. जोपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला तोपर्यंत जवळपास दीड एकर जमीनीतील ऊसाचे पीक तसेच पाच क्विंटल तयार गुळदेखील जळून खाक झाला. आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. बिलरख गावातील नागरीक शेतकरी इंद्रपाल यांनी सांगितले की, सोमवारच्या सायंकाळी हाईटेंशन लाइनमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे ही आग लागली आणि बघता बघता आगीच्या ज्वाळांनी भयानक रुप धारण केले. शेतकर्‍याच्या शेतामध्ये लागलेली आग पाहून असापासच्या शेतात काम करणारे शेतकरी वेळेवर पोचले आणि बर्‍याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here