उत्तर प्रदेश मधील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, बंद साखर कारखाने पुन्हा चालू होणार

262

लखनऊ : बाराबंकी येथील बुढवल आणि सीतापूर च्या महोली येथील ऊस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांना आपला ऊस दूर असणार्‍या साखर कारखान्यांना घेवून जावे लागणार नाही . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उ.प्र. राज्य साखर निगम ची कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या दोन साखर कारखान्यांना पुन्हा सुरु केले जाण्याच्या प्रस्तावावर आपली सैद्धांतिक अनुमती दिली आहे. या दोन्ही कारखान्यांना सुरु केल्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये कारखान्यांच्या आसपासचे क्षेत्र पुन्हा एकदा चमकू लागेल आणि परिसराचा आर्थिक विकासही होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कारखाने पीपीपी मॉडेलवर पुन्हा एकदा अत्याधुनिक मशीनरी सह तयार केले जातील. यामध्ये ऊसाच्या गाळपाशिवाय ऊसापासून विज तयार करण्याचा कोजेन प्लांट आणि डिस्टलरी सुद्धा लावली जाईल. या दोन्ही कारखान्यांमद्ये गाळप हंगाम 2022 पासून सुरु करण्याची तयारी आहे.

गेल्या बसपा च्या राज्यात वर्ष 2010-11 मध्ये 21 साखर कारखान्यांना कमी किंमतीत खाजगी कंपन्यांना विकले जाण्याच्या प्रकरणात सीबीआई तपासणी च्या घेर्‍यात अडकून बदनाम झालेले उत्तर प्रदेश राज्य साखर निकम लि. आता पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हालचालीवर गोरखपूर चा पिपराइच आणि बस्ती च्या मुंडेरवा च्या दशकांपासून बंद पडलेल्या आणि आता पुन्हा नवनिर्मित साखर कारखान्यांमध्ये यावेळी अधिक चांगले उत्पादन झाले.

पिपराइच वर्ष 2007-08 पासून आणि मुंडेरवा 1998-99 पासून बंद पडली होती. या दोन्ही कारखान्यांचे जुने प्लांट खूपच खराब झाले होते, त्यांना हटवून अगदी नवे आणि अत्याधुनिक प्लांट लावले गेले.

आता प्रदेश सरकार या निगम च्या आठ आणि बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा एकदा सुरु करण्यावर जोर देत आहे. यामध्ये सीतापूर च्या महोली आणि बाराबंकी च्या बुढवल च्या आसपास ऊसाची उपलब्धतताही आहे. मथुरा च्या छाता साखर कारखान्याच्या आसपास काही प्रयत्नांमुळे ऊस विकास होवू शकतो. कानपूर गावाच्या घाटमपूर, गाजीपूर च्या नंदगंज, गोंडा च्या नवाबगंज कारखान्यांच्या आसपास ऊस क्षेत्र विकसित झाले तर हे कारखाने पुन्हा चालवता येवू शकतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here