ऊसाच्या सूक्या पानांपासून तयार करा कंपोस्ट खत

रुडकी : ऊस शेतकरी संस्था उत्तराखंड काशीपूर यांच्या वतीने खानपूर च्या मदारपूर गावात एक दिवसीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात तज्ञांनी शेतकऱ्यांना ऊसाची सेंद्रीय शेती करण्याबरोबर शेतात उन्नत प्रजाती, अधुनिक आणि नवे तांत्रिक प्रयोग करण्याचा सल्ला दिला. हरिद्वार चे ऊस निरीक्षक बी. के. चौधरी यांनी मेळाव्याची सुरुवात केली.

त्यांनी ऊस विभागाच्या योजनांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण ही केले. ऊस शेतकरी संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. रजनीश सिंह यांनी ऊसाच्या छोट्या रोपांच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती आणि त्यांच्यावर होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव याची माहिती दिली. त्यांनी ऊसाची पाने जाळणे हे हानिकारक असल्याचे सांगितले, तसेच पाने जाळण्याऐवजी त्यांचा वापर कपोस्ट खतासाठी केला जाऊ शकतो असे सांगितले.

वरीष्ठ वैज्ञानिक डॉ. आईपीएस मलिक म्हणाले, शेतकरी जर नव्या ट्रँच पध्दतीने ऊसाची लागवड करतील तर प्रतिहेक्टर सरासरीपेक्षा अधिक पीक येईल. त्यांनी ऊसाची लागवड नेहमी वेळेतच केली जावी असा सल्लाही दिला. साखर कारखान्याचे प्रतिनिधी राहुल कुमार यांनी कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयींबाबत सांगितले. मेळाव्यात जयकुमार, अनुराग, शुभम, रामदेव, संजीव कुमार, पाल सिंह, जगबीर सिंह, विकास कुमार, राकेश कुमार, जयकरण, कुलविंदर सिंह, सोमबीर, सतवीर, कर्णसिंह, सतीश कुमार, गजे सिंह, ईश्वरपाल, जोगिंदर, मांगेराम आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here