लॉक डाऊन मुळे ऊस शेतकरी चिंतेत

कोरोना वायरस मुळे लागू केलेल्या लॉक डाऊन मुळे जिल्ह्यातील ऊस शेतकरी देखील खूपच चिंतेत आहेत. रसाचा ऊस पिकवणारे हे ऊस शेतकरी आहेत. जे उन्हाळ्यात उसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करतात.

एप्रिल च्या शेवटच्या दिवसांमध्ये उष्णतेचा परिणाम जाणवत आहे. पण लॉक डाऊन मुळे रसाची दुकाने ही बंद आहेत. अशा मध्ये रसासाठी काळा ऊस तयार करणारे शेतकरी खूपच वैतागलेले आहेत. वेळ पूर्ण झाल्यानंतर आता ऊसाचे शेत सुकत आहे. थारियांव क्षेत्रातील उस शेतकऱ्यांनी सांगितले की, या ऊसाला साखर कारखान्यांना देखील विकले जाऊ शकत नाही. यावेळी ऊसाच्या शेतीमध्ये मोठे नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक विकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here