ऊस थकबाकी प्रकरणी शासनाकडून २४ कारखान्यांवर कठोर कारवाई चे संकेत  

680

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

ऊस उत्पादकांच्या एफआरपीप्रकरणी कोल्हापूर विभागातील आणखी २४ कारखान्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटिस बजावण्यात येणार आहे. साखर आयुक्तालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत असून, या विभागात आतापर्यंत १२ साखर कारखान्यांना नोटिस देण्यात आली आहे. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे उसाची बिले जमा केली आहेत. त्याची दखल घेऊन कारखान्यांना नोटिस बजावण्यात येत आहेत. यापूर्वी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार १२ कारखान्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमध्ये असलेल्या साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन २८ फेब्रुवारीला पुण्यात हल्लाबोल आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटिस बजावण्याचे आदेश दिले होते.

एफआरपीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, येत्या काही दिवसांत कोल्हापूर विभागातील आणखी २४ कारखान्यांना संकेत प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून नोटिस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here